पुण्यात घडला धक्कादायक प्रकार- अल्पवयीन मुलाला अटक.

पुण्यात घडला धक्कादायक प्रकार- अल्पवयीन मुलाला अटक.

पुणे, ०५ जून : एकीकडे कोरोनाचे संकट तर पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्यात बुधवारी सकाळी एका अल्पवयीन मुलावर विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगा विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये डोकावून बघत असताना महिलेनं पाहिलं. त्यानंतर या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या अल्पवयीन मुलाला त्वरित अटक करण्यात आली नाही. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेनं पोलिसांना सांगितले की तिला खिडकीजवळ कुणीतरी हालचाल करताना दिसलं आणि तिनं त्या मुलाला जवळून पाहिलं.

पोलिसांनी इनवेश्टीगेट केल्यानंतर सांगितले की, अल्पवयीन मुलगा त्यांच्या शेजारीच राहायचा.

या अल्पवयीन मुलाविरूद्ध देहू रोड पोलिस ठाण्यात कलम ३५४(b) (महिलेची छेडछाड किंवा महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार करणारे कुटुंब लहान मुलांची देखभाल करण्याच काम करतात. तसेच, “ त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर प्रथम त्याचा फोन ताब्यात घेण्यात आला. त्याचा आयडी तपासल्यावर तो १७ वर्षांचा असल्याचं कळलं. शिवाय या घटनेचे त्यानं कुठलेही रेकॉर्डिंग केले आहे की नाही हे आम्ही अद्याप तपासत आहोत”, असे देहू रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सीएम बोरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत