८ जुलै पासून हाॅटेल लाॅज्स उघडण्यास परवानगी.! या अटींनुसार

८ जुलै पासून हाॅटेल लाॅज्स उघडण्यास परवानगी.! या अटींनुसार

महाराष्ट्र : मिशन बिगीन अगेन फेस – ५ हे ८ जुलैपासून अंमलात येणार आहे. या मधे काही अटींनुसार हाॅटेल्स, रेस्टाॅरंट आणि लाॅज्स ८ जुलै पासून ओपन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. काल दि.५ जुलै रविवार रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हाॅटेल्स असोसिएशनच्या पदाधिकांर्याशी संवाद साधून हा उद्योग सुरू करण्यामागे कार्यकारीणी पद्धती तयार केली आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे हाॅटेल्स आणि लाॅज्स यावर देखील बंदी घालण्यात आली होती.

हे देखील वाचा : आनंदाची बातमी ! ठाकरे सरकारकडून भूमिपुत्रांसाठी ‘महाजाॅब्स’ हे वेबपोर्टलं लाॅन्च

मिशन बिगीन अगेन मधे अनेक उद्योगधंदे सुरू करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सलून आणि व्यायामशाळा ओपन करण्याची परवानगी देण्यात आली होती. हाॅटेल्स चा महाराष्ट्राच्या पर्यटनात मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच हे हाॅटेल्स परत कसे सुरू करता येतील याची कार्यकरीणी पद्धती देखील करण्यात आली असून ती फायनल करून लवकरच हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. आज दिनांक ६ जुलै रोजी यावर आदेश काढण्यात आले आहेत. हाॅटेल्स, गेस्टहाऊस, लाॅज्स त्याच्या क्षमतेच्या ३३% क्षमतेवर राहण्यास पर्यटकांना राहण्याची सुविधा देऊ शकतात.

हे ही वाचा : मोठा धक्का! भारतातील तीन औषधांवर WHO ने घातली बंदी..

महापालिका असलेल्या राज्यांना तसेच मुबंई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या शहरांमधे कंटेमेंन्ट क्षेत्रा बाहेरील हाॅटेल्स ना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाॅटेल्स व्यस्थापनांचे आभार देखील मानलेले आहे. हाॅटेल कामगारांना काढून टाकू नये असे सागूंन मुबंई व शहरांतील हाॅटेल्स कोरोना संकंटप्रसंगी सोबत असल्याने त्यांचे अभिनंदन देखील केलेले आहेत. इतर राज्यातही हाॅटेल्सना ३३% चालू करण्याची सुट दिलेली आहे व राहीलेल्या ६७ टक्के क्षमतेचा वापर क्वारन्टाईन साठी करण्याचा अधिकार टरस्पर स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेला आहे.

न्यूज सोर्स- लोकमत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत