साऊथ आफ्रिका क्रिकेट संघासमोर नवीन संकट आले आहे, साऊथ आफ्रीकेचे क्रिकेट बोर्ड साऊथ आफ्रीका ला सरकारी समिती (SASCOC) ने स्थगित केले.
आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही देशाच्या सरकारने जर क्रिकेट मंडळात प्रवेश केला तर त्या क्रिकेट बोर्ड ला आयसीसी मधून रद्द करण्यात येईल. आता साऊथ आफ्रिका सरकारने तेथील क्रिकेट बोर्डवर नियंत्रण मिळवल्याने आयसीसी साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डवर कडक कारवाई करू शकते.
यापूर्वी बंदी घालण्यात आली आहे
१९६९-७० मध्ये देखील साऊथ आफ्रिकेच्या टिमचे क्रिकेटवरील हस्तक्षेप वाढला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्ध या टिमने ४-० अशी मात दिली होती. सलग २१ वर्षे साऊथ आफ्रिका टीमला कोणत्याच खेळात सामील करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावर खूप टीका करण्यात आल्या होत्या. ग्लेनिगल्स कराराच्या माध्यमातून या देशाशी क्रीडासंदर्भात कोणतेही करार नसल्याचे सांगण्यात आले.
नेल्सन मंडेला यांची १९९१ साली तुरूंगातून सुटका झाली. दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान एफडब्ल्यू डी क्लर्क यांच्यातर्फे काही सरकारी धोरणे आखण्यात आली, तेव्हा साऊथ आफ्रिका टीमला क्रिकेटमधे परवानगी मिळाली. या संघाने १९९२ च्या विश्वचषकातही भाग घेतला होता