कार्तिक आर्यन बाॅलीवूड इडंस्ट्रीतील यंग्सटर आहे. खूपच कमी वेळात त्याने आपल्या अॅक्टींग च्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहे. हल्लीच भारत आणि चीन मधे गालवान मधे झालेल्या झटापटीनंतर सर्वत्र भारतभर चीन विषयी द्वेष निर्माण झाला आहे. त्यातच २९ जून रोजी ५९ चीनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली. आत्ता कार्तिक आर्यन ने देखील चीनी मोबाईल्स ची जाहीरात करणे बंद केलेले आहे. कार्तिक आर्यन हा चायनिज मोबाईल ‘ओप्पो’ चा ब्रँड अॅम्बासिडर आहे. परंतु आता त्याने हे ओप्पो ब्रँडशी सर्व संबंध तोडून टाकले असल्याचे दिसत आहे.
पण अजून त्याने असे काही स्पष्ट केलेले नाही.पण आपल्या सोशल मिडीया अकाऊंट वर त्याने फोटो शेअर करून असे संकेत दिले आहे. शिवाय त्याच्या चाहत्यांनी देखील त्यांनी चाईनिझ मोबाईल ची जाहीरात करण्याचे बंद केले असे म्हटले आहे. असे करणारा कार्तिक आर्यन हा बाॅलीवूड इडंस्ट्रीमधील पहीला स्टार आहे. शिवाय बाकीच्यांनी पण त्याच्या कडून हे शिकून घेण्यासारखे आहे.
कोणत्याही ब्रॅड चा अॅम्बासिडर असताना तो त्या ब्रॅड व्यतिरीक्त दुसर्या कोणत्याही ब्रँड च्या मोबाईल चा फोटो आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट करू शकत नाही. पण कार्तिक आर्यन ने आपल्या सोशल मिडीया अकांऊट वर एक फोटो पोस्ट केला आहे त्यात त्याचा हातामधे अॅप्पल चा फोन दिसत आहे. या वरून त्याने ओप्पो ब्रँडशी संबंध तोडल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. शिवाय अजून एका फोटो मधे तो आय फाॅर इंडीयाचा मेसेज देस पोस्ट केला आहे.