धोनी च्या वाढदिवसानिमित्त केदार जाधव झाला भावूक! वाचा काय म्हणाला

धोनी च्या वाढदिवसानिमित्त केदार जाधव झाला भावूक! वाचा काय म्हणाला

क्रिकेट जगतात कॅप्टन कूल या नावाने गाजलेले टीम भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा इज वाढदिवस. अनेक क्रिकेटपट्टूंनी त्याला शुभेच्छाही दिल्या. कोणी आपल्या सोशल मिडीया अकाऊंट्स वरून आपल्या भावना व्यक्त केल्या तर, तर कोणी व्हिडीओज पोस्ट करून शुभेच्छा दिला.
एकूणच सर्वांचा चाहता असा हा खेळाडू होता. त्यापैंकीच भारतीय टीम चे उत्कृष्ट क्रिकेटपट्टू केदार जाधव यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अकाऊंट वरून धोनी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी धोनी साठी इन्साईड क्रिकेटच्या अंतर्गत एक भावनिक अस पत्रं लिहून आपले धोनी बरोबरचे किस्से सांगितले आहेत.

केदार जाधव यांनी पत्रात लिहीले की,” समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहील की मला कायम तुझी आठवण येते. लाईट हाऊस दिशि दाखवण्याचं काम करत, दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं, तुमच्यासारखचं! तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टिकेच्या लाटाही झेलल्या पण खंबीर पणे उभे राहीलात. लाईटहाऊस सारखचं!
दरवर्षी आपण वाढदिवसाला एकमेकांच्या सोबत असतो, या वेळी लाॅकडाऊन मुळे साधी भेटही झाली नाही. मी टिव्हीवर जुन्या मॅचेस पाहताना माझी जर्नी रीकाॅल करत होतो. आपली पार्टनरशीप, स्टम्प मागून तुम्ही दिलेल्या टीप्स, ऑफ द फिल्ड किस्से… सगळचं डोळ्यांसमोरून जात होतं. तेव्हाच डोक्यात आलं की तुमच्या येणार्या बर्थडेला तुम्हाला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावं. देशारा २ वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्राॅफी, टेस्ट रॅकिंग मधे पहीली पोझिशन देणार्या कॅप्टनला मी गिफ्ट म्हणून तरी कार देणार ? काहीचं सुचलं नाही तेव्हाच डोक्यात आलं तुम्हाला पत्रं लिहावं. माझ्यासकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे हे सागांव…!
तुम्हांला पहील्यांदा टीव्हीवर पाहण्यापासून सोबत खेळण्यापर्यंतचा प्रवास कदाटित निटसा आठवणार नाही मला; पण एक प्रवास मात्र माझ्या मनावर कोरला गेलाय. २०१७ मध्ये एका मॅचनंतर आपण ट्रॅव्हल करत होतो. मी फ्लाईटमधे तुमच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. दमल्यामुळे मला लगेच झोप लागली, मी जेवणही तसचं ठेवलं. जाग आली तेव्हा माझ्यासमोर आणखी एकाचं जेवण होतं. मी तुम्हाला विचारलं “हे कोणाचं आहे ?” तुम्ही म्हणालात, “मेरा ही है. अच्छा हुआ तेरी निंद खुल गयी. मैं तेरे ही लिए रूका था, साथ मे खायेंगे.” त्या एका क्षणात माझ्या आयुष्यातील मोठ्या भावाची कमी भरून निघाली. आजही ते क्षण आठवताना मी एक गाणं नेहमी गुणगुणतो, मेरी जिदंगी सवारी…
देशातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी तुम्ही असे अनेक रोल निभावता. कुणाचा मित्र, मेंटाॅर, आयडाॅल तर कित्येकांचा थाला. इडींयाच्या जर्सीत तुम्ही ग्राऊंडवर उभे असता तेव्हा तुमच्या बद्दल काय वाटतं हे लिहता, सांगता तरी येईल; पण तुम्हाला इंडीयन आर्मीच्या युनिफाॅर्ममध्ये पाहून काय वाटतं हे आमच्या डोळ्यांतला अभिमानच सांगू शकेल.
तुम्ही सांगितलेली एक गोष्ट कायम लक्षात असते माझ्या,’केदार लास्ट बाॅल तक उम्मीद नहीं हारनी चाहीए. कोई भी टार्गेट इम्पाॅसिबल नहीं होता. खुद पे भरोसा रख के कोशिश करते रहो. ग्राऊंड पे भी, और जिंदगी में भी.’ हेच तुम्ही अनेकवेळा करूनही दाखवलंत. सामना हरल्यानंतरही चेहर्यावरचं हसू असेल किंवा जिंकल्यावर ट्राॅफी यंगस्टरच्या हातात देऊन कोपर्यात उभं राहणं. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही आम्हाला ‘लाईफ लेसन्स’ दिले. पण त्याही पेक्षा महत्वाचे काम तुम्ही केलतं, ते म्हणजे प्लेअर्सला सपोर्ट करणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि टीम घडवणं. मुलीच्या जीवनानंतर तिला बघायला न जाता,’ I am on national duty so, Ithink everything else can wait.’ म्हणणारा तुमच्यातला कॅप्टन आणि आयपीएल जिंकल्यानंतर फोटो सेशन ऐवजी मुलीसोबत खेळणारा तुमच्यातला बाप ही दोन्ही रूपं आम्ही पाहीलीत. कसं खेळायचं हे शिकवतानाच कसं जगायचं, हेही शिकवलंत.
गेल्या काही महीन्यांपासून कोरोनाचा हाहाकार, जवळच्या वाटणार्या सेलिब्रिटींचं जाण यामुळे देशात थोडा उदासीचा नूर आहे. सगळं काही सुरळीत होईल याची खात्री आहेच; पण असं वाटतं लोकांच्या चेहर्यांवर पुन्हा आनंद येण्यासाठी काहीतरी भारी घडलं पाहीजे. जे पाहायला दुःख, काळजी विसरून सगळा देश एकत्र येईल. तेव्हाच डोक्यात आलं कि, तुम्ही पुन्हा स्टांन्स घेतलात तर हे सगळं घडेलच की…
माही भाई गेली १५ वर्षे तुम्हाला खेळताना पाहीलं तरी अजूनही आमचं मन भरलं नाहीये. माझ्या सकट सगळ्या देशाला तुम्हाला पुन्हा एकदा खेळताना पाहायचंय. तुम्ही क्रिज वर राहाल आणि ‘माही मार रहा है ‘ म्हणतं सगळा देश जल्लोष करेल. तुम्ही नेहमी सारखी झोकात मॅच फिनिश करून शांतपणे पॅविलियन कडे याल. आम्ही भरल्या डोळ्यांनी हेल्मेटमधला तुमचा हसरा चेहरा डोळ्यांत साठवू आणि संगळ्यांचा मनात तेव्हा एकच गाणं वाजत असेल…
अभी ना जाओ छोड़कर…
के दिल अभी भरा नही…
के दिल अभी भरा नही…’

https://www.instagram.com/p/CCU2pbPlvbk/?igshid=l04hh1u12dfo

केदार जाधव यांनी आपल्या इन्साईड क्रिकेटच्या माध्यमातून हे पत्र लिहीले आहे आणि आपल्या इंस्टाग्राम अकांऊट द्वारे पोस्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत