आनंदाची बातमी ! ठाकरे सरकारकडून भूमिपुत्रांसाठी ‘महाजाॅब्स’ हे वेबपोर्टलं लाॅन्च

कोरोनाच्या भीतीने हजारों कामगारांनी आपल्या जीवाच्या काळजीने सथलांतर केले. कोरोनाचा प्रसार बघून या काळात लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यातच ठाकरे सरकारने ‘महाजाॅब्स’ या पोर्टला लाॅन्च केले आहे. या पोर्टल मागे राज्यात भूमिपुत्रांना म्हणजेच मराठी मुलांना रोजगाराची संधी मिळावी हा मुख्य हेतू आहे.

अनेक लोकांनी या काळात स्थलांतर केले तसेच नव नवीन उद्योगही महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. सुमारे ६५ हजार उद्योग राज्यात सुरू झाले आहे. सरकारने नवीन उद्योगधंद्यासाठी महापरवाने देणे देखील सुरू केले आहे.
राज्य शासनाने सुमारे १७ हजार कोटींचे करार देश-विदेशातील नवनवीन कंपन्यांसोबत केले आहे. स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी हे सर्व शासनाने केले आहे. आज ‘महाजाॅब्स’ या वेब पोर्टल चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते. तसेच कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक उपस्थित होते.

स्थलांतरीत कामगार परत येतील की नाही याची खात्री नाही, शिवाय अशा परीस्थितीत उद्योगधंद्यांना मजूरांची कमतरता भासू नये व स्थानिय गरजूना देखील या पोर्टल द्वारे रोजगार मिळेल.इच्छुकांनी केवळ आपली माहीती या पोर्टल वर द्यावी. त्यानंतर विविध कंपन्याकडून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

वेब पोर्टल : http://mahajobs.maharashtra.gov.in

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत