आज दिनांक ८ जुलै रोजी राज्याचा मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
*राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती असताना दुधाचे अतिरीक्त नियोजन निर्माण झाले. याच्या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
*कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ” नाव आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे करण्यात आले.
*मुंबई उपनगरात जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि.यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भाडयाच्या दराबाबत निर्णय.
*महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता.
*मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी दि.३१ मार्च, २०२० रोजी संपुष्टात आला आहे. पण यात मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी आता या योजनेला दोन वर्षाची(सन २०२१-२२ पर्यंत) मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
*मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा 2 राज्यात राबविणे
*आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना परवानगी.
*शिवभोजन थाळीचा दर पुढील अजून ३ महिन्यांसाठी दर ५ रुपये एवढा करण्यात आला.
*एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येईल.