‘ जिवेत् शरद: शतम् ‘ जेष्ठांसाठी आरोग्य योजना ठाकरे सरकारचा निर्णय – वाचा

‘ जिवेत् शरद: शतम् ‘ जेष्ठांसाठी आरोग्य योजना ठाकरे सरकारचा निर्णय – वाचा

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या सत्तेत अनेक नवनवीन योजणा राबवण्यात येत आहेत. त्यापैकीच एक नवीन योजना राबवण्यात आली ती म्हणजे ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना. या योजने अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही आरोग्य योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्याचे प्रस्तावित आहे.
या योजनेचे उद्देश प्रत्येक जेष्ठ नागरीक हा शतायुषी व्हावा हे आहे. तसेच राष्ट्रवादी काॅग्रेस चे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतेच ८१ वर्षात पदार्पण केले असता त्यांचे नावही योजनेच्या नावात सामिल करण्यात येणार आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेची संकल्पना मांडली. या योजनेचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जात आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजना जाहीर करण्याची तयारी सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत