घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बनवा रेशन कार्ड

घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बनवा रेशन कार्ड

‘वन नेशन,वन रेशन कार्ड’ ही योजणा राबवण्याची माहीती केंद्र सरकारने दिलेली आहे. रेशन कार्ड हे संगळ्यासाठी अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. गरीबांसाठी जास्त महत्वाचं कागदपत्र आहे. मुख्यतः बहुते सरकारी कामांसाठी रेशन कार्डची गरज भासते. प्रत्येक कुटूंबाकडे रेशन कार्ड असले पाहीजे. देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे आपली आर्थीक व्यवस्था कोलमंडली आहे. सगळे व्यवहार बंद झाल्यामुळे हातावर पोट असणार्यांच्या खाण्यापिण्याचे खूप हाल झालेले बघता केंद्र आणि राज्य सरकारने गरींबासाठी मोफत तसेच कमी किंमतीत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला.

शिवाय घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं नाव रेशन कार्ड मधे नोंदवलेले नसल्यास ते आता ऑनलाइन रीत्या करता येते. ते कसे करायचे हे आपण जाणून घेऊया.

●रेशनकार्ड वर ऑनलाइन माहीती अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट वर जाऊन जर तुम्ही पहील्यांदाच साईटवर गेला असाल तर तुम्हाला लाॅग इन आयडी तयार करणे भाग आहे. ●लाॅगइन आयडी बनवून झाल्यानंतर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल तेव्हा नव्या सदस्याचे नाव समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करा. ● मग तुमच्या समोर एक फाॅर्म ओपन होईल त्यात तुम्हाला ज्या सदस्याची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहीती भरायची आहे. ● त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची काॅपी अपलोड करण्याचा पर्याय येईल. तेथे तुम्हाला आवश्यक त्या कागदपत्रांची काॅपी स्कॅनकरून अपलोड करायची आहे. ● सर्व माहीती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.मग तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. त्याचा सहाय्याने तुमच्या अपडेशन चे स्टेटस् तुम्हो चेक किंवा ट्रॅक करू शकता. ● तुमचे कागदपत्र आणि तुमचा फार्म अधिकारी तपासतील.
तुम्ही दिलेली माहीती योग्य असल्यास फार्मचा स्वीकार करण्यात येईल व रेशन कार्ड पोस्टाद्वारे घरी पाठविले जाईल.

आवश्यक ती कागदपत्रे:
कुटूंब प्रमुख्याचे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. त्याची एक फोटोकाॅफी असावी. तसेच जर मुलांची नाव नोंदवायची असतील तर त्यांचे जन्मदाखले व आई वडीलांचे आधारकार्ड सोबत असावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत