१० ऑक्टोंबर महाराष्ट्र बंद आंदोलन- मराठा आरक्षण समिती..

१० ऑक्टोंबर महाराष्ट्र बंद आंदोलन- मराठा आरक्षण समिती..

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मराठा आरक्षण समितीने दिली आहे. ‘मातोश्री’ बाहेर ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असून १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला देण्याच्या निर्णयाला शासनाने स्थगिती दिली आहे.
संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाचे आरक्षण राज्यसरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मिळालेले थांबले. मराठा समाजाच्या मागण्या जर ९ ऑक्टोंबर पर्यंत मान्य झाल्या नाहीत तर १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा मराठा समितीने दिला. 

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधे १० टक्के आरक्षण देण्याची शासनाने भूमिका घेतलेली पण त्यात मतभेद असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. ईडब्ल्यूएसच्या सर्व सवलती मराठा समाजाला देण्यात येतील पण १० टक्के आरक्षण देण्यात येणार नाही असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकितही घेण्यात आला.
महाराष्ट्र बंद मागच्या मराठा समितीच्या मागण्या..

 EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा आणि समाजातील तरुणांवर दाखल झालेले बोगस गुन्हे रद्द करा. या तीन गोष्टी सरकारने मान्य केल्या तर कदाचित १० तारखेच्या बंदवर विचार करू अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत