सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक! बाॅलीवूडला इशारा..

सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक! बाॅलीवूडला इशारा..

सुशांतच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक! बाॅलीवूडला इशारा. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर मनसे कठोर पाऊल उचलेल.

मुंबई : १४ जूनला सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. बांद्रायेथील आपल्या राहत्या घरी बेडरूम मधे त्याने गळफास लावून घेतला. सुशांतच्या आत्महत्येसाठी विशेषतः मुख्य असे कारण नव्हते. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते असे म्हटले जात आहे. मनसे नेते अभिजीत पाणसे म्हणाले अशाप्रकारे कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करत असेल, तर मनसेच्या वतीने त्यांना दणका देण्यात येईल, अशा इशारा त्यांनी केला आहे. यावर वेळीच लक्ष द्यावे, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यावर काम करतच आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काहींची चौकशी सुरू झाली आहे. सगळ्या चित्रपट इंडस्ट्री शोकाकुळ व्यक्त करत आहे. मनसे नेते अभिजीत पाणसेंनी देखील दुर्दैवी घटना झाली म्हटले आहे. एकूणच सुशांत सगळ्यांचा मनात घर करून गेला असे म्हणता येईल.

Abhijit Panse MNS

अभिजीत पाणसे म्हणतात एखादा कलाकार म्हणून पाहता चित्रपट हिरावले जाणे, बदनाम केले जाणे, चित्रपट रिलीज होऊ न देणे, टाॅर्चर करणे हे फार क्लेशदायक आहे. एखाद्या कलाकाराचे पैसा आणि प्रसिद्धि पेक्षा स्वतःच्या कलेवर जास्त प्रेम असते. पंरतु तुमच जास्त प्रेम असलेली गोष्ट करू दिली नाही तर त्या गोष्टिचा स्फोट होतोच. नेपोटीज्म हे बाॅलीवूड मधे खूप प्रमाणात असल्याचे दिसून येत, परंतु नेमकी माहीती असल्याशिवाय यावर बोलणे योग्य नाही. एखाद्याचा बदला म्हणून त्याला कमी लेखणे किंवा इंडस्ट्रिच्या बाहेर काढणे हा गुन्हा आहे.

हेही वाचा : आता घरच्याघरीच कोरोनावर उपचार करून करा मात : डाॅक्टरांनी दिला सल्ला

मराठी चित्रपटसृष्टीत बघता वातावरण एकदम सलोख्याचे असते. तिथे नेपोटीज्म अस म्हणता येणार नाही. ग्रुपाज्म वगैरा म्हटले जाते पण त्याची दुसरी बाजू लक्षात घेता, मी चित्रपट करताना माझ्याशी आयुष्यात चांगली माणसे जी वागलेली असतात त्यांना संधी द्यायची माझी इच्छा असणं स्वाभाविकच आहे. किंवा काही कलाकार उत्तम काम करतात ते सतत तुमच्या प्रोसेस मधे दिसतात याचा अर्थ नेपोटीज्म होत नाही. आज हजारो दमदार कलाकार मराठी चित्रपट सृष्टीत आहेत आणि समजा एखादी पुण्यातील चित्रपट चालू असेल तर त्यात पुण्यातील लोक येणं स्वाभाविक आहे. मुंबईतील ग्रुप असतात, नाटकाचे ग्रुप असतात, एकांकिकाचे असतात, संस्थाचे असतात त्यामुळे एखाद्याचे करीअर संपवण्याच्या हेतूने अस मराठी इंडस्ट्रिज् मधे घडत नाही.

हे प्रकार वेळीच थांबवण्याचा इशारा मनसेकडून करण्यात आला अन्यथा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे प्रेक्षक म्हणून चित्रपट पाहणे किंवा त्यांचे चित्रपटच प्रदर्शित होणे बंद केले जाईल, असा टोला अभिजीत पानसे यांनी बजावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत