मनसेचा दणका ! टी-सीरीज म्युजिक कंपनीने मागितली माफी..

मनसेचा दणका ! टी-सीरीज म्युजिक कंपनीने मागितली माफी..

टी-सीरीज म्युजिक कंपनीने पत्राद्वारे मागितली माफी.

‘टी-सीरीज’ या म्युजिक कंपनीने अतिफ असलम या पाकिस्तानी कलाकाराने गायिलेले ‘किंना सोना हे गाणं प्रदर्शित केले होते. मागील पुलवामा अटॅक नंतर मनसेने पाकिस्तानी कलांकाराचा तीव्र विरोध केला आहे.

असे असताना देखील टी-सीरीज या भारतीय म्युजिक कंपनीने पाकीस्तानी कलाकाराचे गाणं आपल्या यु ट्युब चॅनेल द्वारे रीलीज केले होते. त्यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

या आक्षेपानंतर ताबोडतोब ‘टी सीरीज’ च्या व्यवस्थापकांनी ते गाणे त्यांच्या प्रमोशन टीम मधील एका कर्मचार्याने रीलीज केले व त्याला माहित नसल्यामुळे त्याच्याकडून ही चूक झाली असल्याचे सागिंतले. आणि ते गाणे आपल्या युट्यूब चॅनेलवरून काढून टाकले व पत्राद्वारे माफी मागितली.

फोटो क्रेडीट – मनसे वृत्तांत अधिकृत

हे देखील वाचा : ‘गूगल पे’ द्वारे पेमेंट करणे धोकादायक: आरबीआय चा मोठा खुलासा..

शिवाय या पुढे हे गाणे आमच्या युट्यूब चॅनेलवर रीलीज किंवा प्रोमोट केले जाणार नाही तसेच पाकीस्तानी कलाकाराला आम्ही कोणत्याही बाबींमधे सामील करणार नाही याची खात्री पत्राद्वारे दिलेली आहे.

वाचा : ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी – अमित ठाकरे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत