मुंबई : अखेर ११ महिन्यांनंतर सर्व जनतेसाठी लोकल सेवा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल पुन्हा सर्वांसाठी रूळावर येणार ही बातमी दिलासा देणारी आहे. सर्वात आधी आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. त्यांनतर महिलांना ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळाली. १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू होणार आहे. मात्र काही वेळेतच प्रवाश्यांना प्रवास करता येणार आहे.
हेदेखील वाचा – सर्वांसाठी लोकलसेवा १ फेब्रुवारीपासून सुरू या असतील अटी-
ठरवण्यात आलेल्या वेळ वगळता अन्य वेळेत प्रवास करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि रेल्वे कायदा या अंतर्त्यागत प्रवाश्यांवर कारवाई होईल, असे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.
त्यामुळे सामान्य जनतेला लोकलने प्रवास करताना वेळेच्या नियोजनांचे पालन करणे बंधणकारक आहे. शिवाय यामुळे अत्यंत गर्दी होण्याची शक्यता असल्याने ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे.
कोणतीही अडचण अल्यास प्रवासी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क प्रवासी साधू शकतात.
त्यात २००० होमगार्ड आणि ६५० रेल्वे पोलिसांचा समावेश असेल अशी एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात रेल्वे पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे.