सर्वांसाठी लोकलसेवा १ फेब्रुवारीपासून सुरू या असतील अटी-

सर्वांसाठी लोकलसेवा १ फेब्रुवारीपासून सुरू या असतील अटी-

सर्व प्रवाश्यांकरता मुबंई व एम एम आर क्षेत्रात प्रवासाकरीता दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पासून परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मुबंईची लाईफलाइन असलेली लोकलसेवा बंद झालेली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुबंई लोकल अत्याआवश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्यांसाठी सुरू करण्यात आली.
परंतु आजच्या कॅबिनेट मीटींग मधे लोकलसेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु काही ठाराविक वेळेतच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.
१~ सर्व प्रवाश्यांसाठी लोकल प्रवासासाठी खालीलप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे:

  • दिवसाच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७.०० वाजेपर्यंत,
  • दुपारी १२.०० वाजल्यापासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत,
  • रात्री ९.०० वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत.
    २- सकाळी ७.०० वाजल्यापासून दुपारी १२.०० व संध्याकाळी ४.०० वाजल्यापासून रात्री ९.०० वाजेपर्यंत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या प्रवर्गातील प्रवाश्यांना प्रवास करता येईल.
    ३- उपहारगृहे रात्री १.०० वाजेपर्यंत आणि सर्व दुकाने रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील,
    ४- मात्र दुकाने व आस्थापनांकरीता कमाल ३०% कर्मचार्यांची अट व उपहारगृहे, फुड कोर्ट इत्यादीसाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) कायम राहतील.
    ५- सर्वांकरीता विहीत वेळेत प्रवासाची सुविधा लक्षात घेता त्याप्रमाणे कार्यालयीन वेळा ठरविण्याबाबत सर्व आस्थापना व कार्यालयांना विनंती करण्यात यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत