१ जुलै पासून बँकांचे नवीन नियम! वाचा

१ जुलै पासून बँकांचे नवीन नियम! वाचा

१ जुलै पासून बॅकांचे नवीन नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत.
लाॅकडाऊनच्या काळात आपल्याला ३० जून पर्यंत बँकांकडून काही सवलती देण्यात आल्या होत्या. त्यांची मुदत आता संपलेली आहे. आता यापुढे काय तर आपल्याला बँकांचे नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.

नियम पुढील प्रमाणे आहेत:

१. मिनिमम बॅलेंस नसल्यास दंड: बँकेच्या नियमानुसार तुमच्या खात्या मधे मिनिमम बॅलेंस असणे आवश्यक आहे. मिनिमम बॅलेंस नसल्यास दंड आकारला जायचा. परंतु या लाॅकडाऊन दरम्यान केंद्र सरकारकडून सूट देण्यात आली होती. शिवाय एटीएम द्वारा पैसे काढल्यावर देखील लागणारे चार्जेस वर ३० जून पर्यंत सूट देण्यात आली होती. परंतु आता त्याची मुदत संपलेली आहे व केंद्र सरकार कडून कोणतीही मुदत वाढीची मागणी झाली नसल्यामुळे आता मिनिमम बॅलेंस नसल्यास दंड भरावा लागणार आहे.

हे देखील वाचा : या गोष्टींसाठी अनलाॅक २.० मधे सवलती दिल्या ! जाणून घ्या…
२. एटीएम ट्रानझॅक्शन संबधित नियम: एटीएम मधून पैसे काढल्यावर शुल्क आकारला जात होता. कोणतीही बँक ५ वेळा फ्रि ट्रान्झॅक्शन म्हणजेच ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यास शुल्क नाही आकारायची. तसेच दुसर्या बँकेच्या एटीएम मधून ३ वेळा विनाशुल्क पैसे काढता येतात. पण केद्र सरकार कडून तीन महीन्यांसाठी यावर सूट देण्यात आली होती. पण आता त्याची मुदत संपल्या मुळे १ जुलैपासून तुम्हाला काही ट्रान्झॅक्शन्स नंतर शुल्क भरावे लागणार आहेत. म्हणजेच लाॅकडाऊन पूर्वी जसे नियम होते तेच नियम एटीएम संबधी लागू होणार आहेत.
३. बँकेतील बचत खात्यातील सेविंग वरील व्याजदरात घट :
खातेधारकांना याआधी सेविंग डीपोजित वर ४ टक्के व्याज दर मिळायचा. पण आता त्यामधे घट होऊन हा व्याजदर ३.२५ टक्क्यांवर आला आहे. साधारणतः ०.७५ टक्क्याने हा व्याजदर खालावला आहे.
४. पीएफ (प्रोव्हीडंट फंड) मधून रक्कम काढण्याची मुदत संपली: लाॅकडाऊन मुळे आपल्या पीएफ मधील पैसे काढण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली होती पण आता त्याची मुदत देछील संपलेली आहे.
५. प्रिमीयम बचत खात्यांसाठी मिनिमम बॅलेंस ची अधिक लिमीट:
इतर खात्यांतील मिनिमम अकांऊट बँलेंस पेक्षा जास्त रक्कम प्रिमीयम बचत खातेधारकांना आपल्या खात्यात ठेवावी लागणार आहे.
६.बँक अकाऊंट फ्रिज होण्याची शक्यता : आपले बँक खाते चालू ठेवण्यासाठी खातेधारक आवश्यक ते डाॅक्यूमेंट्स देण्यास अपयशी ठरल्यास बँक तुमचे खाते फ्रिज करू शकते.
७.म्युच्युअल फंडवर स्टॅम्प ड्युटी आकारण्यात येणार: म्युच्युअल खरेदी करताना त्यावर सरकारकडून आकारण्यात येणारा टॅक्स आता स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमात आकारण्यात येणार.
८. लघु, मध्यम उद्योगांची आॅनलाईन नोंदणी: आता लघु उद्योगांची नोंदणी करण्यासाठी कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करण्याची गरज लागणार नाही. सर्व प्रक्रीया आॅनलाईन पद्धतीने होणार.
९. किसान सन्मान निधी नोदंणीची मुदत देखील संपलेली आहे: आत्ता पर्यंत नोंदणी झालेल्या सर्व शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रूपये मिळणार.
१०. अटल पेन्शन योजनेत ऑटो डेबिट सुरू : १८ ते ४० वर्षातील नोकरदार वर्ग या योजनेत सुरूवातीचे ५ वर्ष दरमहीन्याला जी रक्कम जमा करतात. त्याच्या ५० टक्के रक्कम.सरकार देखील जमा करणार आणि वयाच्या ६० वर्षानंतर त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत