मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही. लाॅकडाऊन काळात प्रवास करणे आता सोयीस्कर झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तब्बल दोन महिन्या पेक्षा जास्त लॉकडाऊन करण्यात आला त्यामूळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णता ढासळली आहे तरीही कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव कमी होत नाही आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी पुनश्च हरीओम म्हणत राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली. या “मिशन बिगीन अगेन” बाबत जारी केलेल्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
स्वपनगरी असलेल्या मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनच्या काळात निर्बंध घातले होते ते आता सरकारने उठवले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नाही. राज्य सरकारने आधी जारी केलेल्या नियमावलीत तसे बदल केले आहेत.
हेदेखील वाचा : जाणून घ्या का आहे निलगिरी तेल फायदेशीर.
राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत जारी केलेल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर विभागात (MMR) प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई, ठाणे,कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई, पनवेल,, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या रहिवाशांना एमएमआर भागात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही.एकूणच मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही. याआधी अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी पास घेऊनच प्रवास करण्याची मूभा होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.