ठाणे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कालदिवसभरात ठाण्यात ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच कालच्या दिवसात जिल्यात २०२७ कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३८ हजार ५९४ झाली असून मृतांची संख्या ११७६ वर आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या ४२० तर १७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ९९८० व मृतांची संख्या ३६९ वर पोचली आहे. हे वाचा : मोठा निर्णय! चिंचपोकळी चिंतामणी यंदा पारंपारीक मूर्तीची स्थापना करणार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल शुक्रवारी रोजी ५६४ रुग्ण सापडले व तीन जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ८०४९ व मृतांची संख्या १३० वर पोचली आहे.या वाढत्या रूग्णाच्या संख्येबरोबर वाढत्या मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत २५७ नवीन रुग्णांची भर पडली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण बाधितंची संख्या आता ७६०२ तर मृतांची संख्या २३२ वर पोहोचली आहे.शिवाय अंबरनाथमध्ये रुग्णांची संख्या १०१ व ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये नव्या ४८ रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे बाधितांची संख्या आता ९०६ झाली आहे. ठाण्याच्या ग्रामीण भागात १०८ रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे बाधितांची संख्या १९०७ वर पोचली आहे.