कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वत्र लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. परंतु सगळ्या गोष्टींचा आढावा घेत प्रशासनाने हळूहळू आवश्यक असलेल्या लोकांना लोकल सेवा काहीप्रमाणात सुरू केली आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवासाचे हाल होत आहेत.
परंतु लवकरच सर्वसामान्य लोकांना देखील लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल असे चिन्ह दिसत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसल्याने प्रशासनाने सर्वांसाठी लोकलसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
लोकलसेवे अभावी होत असलेल्या प्रवास यातनांना आता लोकांना सामोरे जावे लागणार नाही. आठवड्याभरातच याविषयी बैठका घेण्यात येणार आहेत. या महत्वपूर्ण बैठकांत सर्वांना लोकल सेवा सुरू करण्याची तारीख देखील निश्चित करण्यात येईल.
१५ डिसेंबरनंतर सर्वांना लोकल सेवेची मुभा देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. होणार्या महत्वपूर्ण बैठकांत या निर्णयावर शिक्कामोर्फत होण्याची शक्यता आहे. शिवाय या बैठकीत राज्य, महापालिका रेल्वे अधिकारी देखील सहभागी होणार आहेत.
प्रवासाच्या मुभेबरोबरच प्रवाशांना काही नियमांचे देखील पालन करणे आवश्यक असेल. मास्क वापरणे सक्तीचे असेल शिवाय नियमांचे पालन न करणार्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असे महापालिका अधिकर्यांनी म्हटले आहे.
११~१२ डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत कोरोनाचा आढावा घेत लोकल प्रवाशाच्या मुभेवर निर्णय घेण्यात येईल असे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.