मुंबईच्या गोरेगाव परिसरातील धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई – हाथरसच्या घटनेवरुन देशात संताप होत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत देखील गोरेगाव परिसरात सोमवारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे.
गोरेगावयेथील आरे कॉलनीत ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडलेली आहे.प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवाय हा आरोपी घरच्यांचा ओळखीतला होता. त्यावर पोलीसांनी पाॅक्सो अंतर्घगत गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलीसांकडून या घटनेचा तपास अजून चालू आहे. या घटनेवरुन मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हेदेखील वाचा : हाथरस आणि बलरामपूर बलात्कार प्रकरणांवर संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार्यांच्या टिप्पण्या ‘अनावश्यक व अवांछित’ असल्याचा भारताकडून दावा.

मनसेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना आग्रहाची विनंती केली आहे कि, आरोपीला फक्त अर्ध्या तासासाठी आमच्या- मनसेच्या रणरागिणींच्या ताब्यात पोलीसांनी द्यावे. ‘मनसे स्टाईलने त्या आरोपीची चौकशी’ करून आम्ही त्याला पुन्हा पोलिसांकडे देऊ. बघूया, त्यानंतर एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी आक्रमकरीत्या भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

आभाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही गोरेगाव येथे घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर टोलेबाजी केली ,लाज वाटली पाहिजे, रोज मोकाट हरामखोरकडनं महिला मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत, महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्याहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत