गूगल पे थर्ड पार्टी अॅप (टीपीएपी) आहे आणि कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिल्ली हायकोर्टाला सांगितले आहे.
त्यामुळे त्यांचे कामकाज २००७ च्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम कायद्याचे उल्लंघन करत नाही, असे आरबीआयने सरन्यायाधीश डी एन पटेल आणि न्यायाधीश प्रतीक जालान यांच्या खंडपीठाला सांगितले आहे.
शिवाय ‘एनपीसीआय’ द्वारे २० मार्च २०१९ रोजी जाहीर झालेल्या अधिकृत ‘पेमेंट सिस्टम ऑपरेटर’ च्या यादीमध्ये गुगल पे चा समावेश देखील नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
हे देखील वाचा : ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी – अमित ठाकरे.
गूगल पे कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही, त्यामुळे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय)अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटरच्या प्रकाशित केलेल्या यादीत ते सापडत नाही असेही आरबीआयने कोर्टाला सांगितले आहे.
Google चे मोबाइल पेमेंट अॅप म्हणजेच ‘गुगल पे’ किंवा ‘जीपी’ ही आवश्यक परवानगी आरबीआयकडून न घेता आर्थिक व्यवहार सुलभ करते. आरबीआय ने केलेल्या या सबमिशनला आर्थिक अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांनी केलेल्या याचिकेमधे चांगला प्रतिसाद मिळाला आहे.