कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जवळपास यावर्षीचे सर्वच सणांची मजा नाहीशी झालेलो आहे. दरवर्षीप्रमाणे सण साजरा करता येत नाही आहेत. लोकांचा आनंद उत्साह देखील कोरोना मुळे खालावलेला आहे.
शिवाय नवरात्रोत्सव देखील काही दिवसांवर आलेला आहे. यावेळी नवरात्रोत्सव साजरा करायला भेटेल की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. परंतु कोरोनाचे संकट ही आपल्यावर आहे ते नियंत्रित राहण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणेच राज्याचा गृहविभागाने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.
या नियमांनुसार यावर्षी गरबा, दांडीया यासांरख्या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक कार्यक्रम करताना देखील गर्दी न करण्याचा सूचना दील्या.
राज्याच्या गृहविभागाकडून आलेल्या नियमांनुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या देवीची मूर्ती ४ फूट पेक्षा जास्त नसावी तसेच घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूट अशी मर्यादा घालण्यात आली आहे.
दसर्याचा दिवशी रावण दहन करण्यात येणार आहे. परंतु गर्दी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहीमेचा प्रचार करावा. कोरोनासंर्दभात जनजागृती करण्याची मोहीम नवरात्रोत्सवा दरम्यान राबवण्याचे आवाहनही करण्यात आले.
नियमावली:
●कोरोनाची परीस्थिती पाहता महापालिका, न्यायालय आणि स्थानिक प्रशासनानं मंडंपासाठी आखलेल्या नियमांच पालन करणे अनिवार्य.
● सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका आणि स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.
● यावर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने करण्यात येत असल्याने सार्वजनिक व घरगुती नवरात्रोत्सवाची सजावट देखील साध्याप्रमाणेच करावी.
● देवीच्या मूर्तीची उंचीची मर्यादा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळासाठी ४ फूट तसेच घरगुती मूर्तीची उंची २ फूट मर्यादा केलेली आहे.