राज्य सरकारने कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात केलेला लॉकडाऊन ५ टप्प्याटप्प्यानं उघडण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. ठाणे शहर मधील काही भागात झाले नियमांचे उल्लंघन.
ठाणे, ५ जून: राज्य सरकारने कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात केलेला लॉकडाऊन ५ टप्प्याटप्प्यानं उठवण्याबात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे शहर महानगर पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. फरंतु, प्रशासनाची आदेशामुळे दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कोपरी-नौपाडा प्रभागाच्या हद्दीतील दुकाने उघडण्याचा काढण्यात आलेला आदेश हा गोंधळ निर्माण करणारा आहे. या आदेशावर पोलिसांनीदेखील आक्षेप घेतला आहे. कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने सम-विषम तारखेनुसार उघडण्यास परवानगी देण्याबरोबर या अंतर्गत येणाऱ्या छोट्या मोठ्या गल्ल्यांचाही यामध्ये समावेश करणे अत्यंत महत्वाचे होते पण तसे या आदेशामध्ये करण्यात आलेले नाही.
हे देखील वाचा : हिंगाचे औषधोपयोगी फायदे जाणून घ्या.
त्यामुळे आज दिनांक, ५ जुन २०२० शुक्रवार रोजी दोन्ही बाजूची काही दुकाने उघडी करण्यात आली. पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सुधारित आदेश काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
मागील दीड ते दोन महिने ठाणे शहर मधील पूर्णपणे बंद असल्याने अर्थव्यवस्था पूर्ण थप्प झाली होती. अखेर शुक्रवारपासून दुकाने उघडायला परवानगी देण्यात आली.
तरी कोपरी आणि नौपाडा प्रभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडली त्यामुळे परिसरातील दुकाने सम-विषम तारखेला उघडी करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र, कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेपर्यंत दोन्ही बाजूनी दुकाने काही प्रमाणात उघडी करण्यात आली असून ठाणे महापालिकेची ही ऑर्डर गोंधळात टाकणारी आहे, असे नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे.