सगळया गोष्टी बंद असताना लॉकडाऊन दरम्यान पार्ले-जी बिस्किटची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली.
न्यू दिल्ली : लोकांच्या अगदी सहजतेने घरा-घरात पोहचलेल्या पार्ले-जी बिस्किटांनी मे महिन्यात विक्रीचे रेकॉर्ड तोडले. खरं तर, कोविड-१९ अश्या साथीच्या रोगाची माहामारी असलेल्या काळात तसेच देशव्यापी लॉकडाउनमुळे अनेक व्यापारयाचे नुकसान झाले असले तरी पार्ले-जी कंपनीची बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की गेल्या ८२ वर्षांचा विक्रम मोडला काडला आहे.
हे देखील वाचा: डोकेदुखी पळवण्यासाठी हे करुन पाहा.
जरी कंपनीने विक्रीचे आकडे दिले नसले तरी लॉकडाऊन दरम्यान पार्ले-जी बिस्किटची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली. असे बोलले जाते आहे की मार्च ,एप्रिल आणि मे हे गेल्या 8 दशकातील विक्री पेक्ष्या सर्वोत्कृष्ट विक्री झाली असे बोलले जात आहे. खरं तर, केवळ ५ रुपयात मिळणारे पार्ले-जी बिस्किटांचे पॅकेट शेकडो किलोमीटर चालत असलेल्या प्रवाश्यांसाठीही खूप उपयुक्त ठरले आहे.
काहींनी ते स्वत: विकत घेतले आणि इतरांनी मदतीसाठी बिस्किटे वाटण्याचे कार्य केली. पार्ले प्रॉडक्टस कॅटेगरीचे प्रमुख मयंक शहा यांनी मंगळवारी सांगितले की कंपनीच्या एकूण बाजाराचा वाटा सुमारे ५ टक्क्यांनी वाढला आहे आणि या वाढीचा ८० – ९० टक्के हिस्सा पार्ले-जीच्या विक्रीतून आला आहे.
उल्लेखनीय आहे की १९३८ पासून, पार्ले जी हे भारतातील एक प्रख्यात नाव आहे.