एटीएम चा वापर करत आहात ? ही काळजी नक्की घ्या..

एटीएम चा वापर करत आहात ? ही काळजी नक्की घ्या..

बँकिंग सेवा अधिक सुरक्षित करण्यासाठी ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून स्टेट बँक कठोर नियमांची अंमलबजावणी करत आहे. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नवनव्या पद्धतींचा वापर करत असतात. 
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी सिक्यूरिटी टिप्स जारी केल्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात बहुतेकजण एटीएम वापर करत असतात. एटीएम चावापर करत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी बाळगायला हवी यासंर्दभातची माहिती एसबीआयने दिली आहे. 
१.एटीएम कार्डचा एटीएम मशीनमध्ये वापर करत असताना नेहमी एटीएम मशीनवरील कीपॅड तुमच्या एका हाताने झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमचा पीन पाहू शकणार नाही.
२. तुमचा एटीएम पिन एटीएम कार्डवर लिहून ठेवू नये
३. एटीएम डिटेल्स कुणासोबतही शेअर करू नका. 
४. कोणालाही फोनकाॅर्ल्स वर तुमच्या एटीएम कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती किंवा कधीच कुणाला देऊ नका. बँकिंग फोन कॉल्स कधीच तुम्हाला तुमचा पिन विचारत नाहीत. 
५. शिवाय एटीएम चा पिन हा गाडीचा नंबर,वाढदिवसाचो तारीख असा ठेवू नका जेणेकरून कोणीही सहजरीत्या हॅक करू शकेल.
६. बँकिंग सेवेची मिळणारी स्लीप पूर्णपणे फाडून फेकून द्या किंवा तुमच्या जवळच ठेवा.
७.एटीएमचा वापर करताना कुठे धुपा कॅमेरा वगैरा आहे का याची पडताळणी करून घ्या व नंतरच पुढोल प्रोसेस करा.
८.एटीएममध्ये पिन टाकत असताना किपॅडच्या जागेवर काही प्लास्टिकचे कव्हर किंवा किपॅड सुयोग्य बसवलेला आहे याची काळजी घ्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत