नवी दिल्ली, ०८ जून : आजच्या कोरोनाच्या संकटात आजपासून लॉकडाऊन हटवण्याच्या पहिला टप्पा अनलॉक-१ ला सुरुवात झाली.आज पहिल्याच दिवशी सोन्याचा दर -चांदीच्या किंमतीत घट पाहायला मिळाली.
तसेच चांदीच्या किमंतीतदेखील घट झाली आहे. आज २२ कॅरेट ते २४ कॅरेट सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत २९६ रुपयांनी प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. यासह सोन्याचे दर ४६ हजार ४०० रू. प्रति १० ग्रॅम झाले आहेत.
१ जून २०२० रोजी, २४ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ०४३ होते.
२ जून २०२० रोजी दर ४७ हजार ०७५ होते.
३ जून २०२० रोजी, दर उतरून ४६ हजार ८७५ झाले.
४ जून २०२० रोजी, सोन्याचे दर ४६ हजार ७६७ होते.
लाॅकडाऊन १.०, लाॅकडाऊन २.०, लाॅकडाऊन ३.० मधील सोन्याचा भावामधे सतत वाढ होत होती. परंतु ही वाढ लाॅकडाऊन ४ मधे थांबली.लाॅकडाऊन ४.० मधील ३ दिवसात सोन्याचा भाव ४७ हजारांच्या वर गेला होता. व अखेरपर्यंत सोन्याचा किंती ९३२ रूपये प्रति तोळाने घसरल्या.