सिंधुताई सपकाळ म्हणजे निष्पक्ष समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण.
जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जात होते. सिंधूताई सकपाळ यांच ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ज्याचं कोणी नाही, त्यांची सिंधुताई.
आपलं पूर्ण आयुष्य अनाथांसाठी तसेच गरजूंसाठी व्यतित केलेल्या सिंधुताई म्हणजे मायेचा अखंड झराच. आज सिंधुताई च्या जाण्याने आपल्या राज्याची खुप मोठी हानी झाली आहे.
सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सिंधुताईं सपकाळ यांना केंद्र सरकारने पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.