बजेट २०२१~ भारताच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सितारामण यांनी काल दिनांक १ फेब्रुवारी रोजी २०२१ चा बजेट सादर केला. महाराष्ट्रासाठी नाशिक मेट्रो फेज १ आणि नागपूर मेट्रो फेज २ ची घोषणा करण्यात आली.
कोरोना संकटामुळे आरोग्य क्षोत्राकडे जास्त लक्ष देण्यात येऊन गुंतवणूक देखील जास्त करण्यात आली आहे शिवाय कोरोना प्रतिबंधक लसी साठी एकूण ३५००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे
- प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्याची घोषणा करण्यात आली
- १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि २ मोबाईल हॉस्पिटलची घोषणा
- आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद
- नवीन आरोग्य योजनांसाठी ६४ हजार कोटींची तरतूद
- कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची गुंतवणूक
- आवशक्य असल्यास कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येईल
- कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला.
- १५ वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी जेणेकरून प्रदुषण आटोक्यात येईल
- देशभरात ७ मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार
- डीएफआयसाठी ३ वर्षांकरिता ५ लाख कोटींच्या निधीची तरतूद
- दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करण्यात येणार
- २०३० पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न
- रेल्वेसाठी १ लाख १० हजार ५५ कोटींच्या निधीची घोषणा
- येत्या ३ वर्षात ७ टेक्स्टाईल पार्कची निर्मिती त्यात कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतील
- रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी
- मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद
- २०३० पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार
- सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी १८ हजार कोटी
- नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा
- नाशिकसाठी २ हजार ९२ कोटी आणि नागपूरसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद
- विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा ४९ वरून ७४ टक्क्यांवर
- सरकारी बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद
- या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
- बीपीसीएल,एअर इंडिया, पवनहंस, आयडीबीआयची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार
- मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून १ लाख ७५ हजार कोटींचा निधी उभारणार
- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट
- गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद
- पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा
- १६.५ लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट
- १०० नवीन सैनिक स्कूलची घोषणा
- १ हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणेशी जोडणार
- असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार
- सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न करण्यात येतील
- आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारणार
- पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद
- लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद
- गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार
- डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार हून अधिक कोटींची तरतूद
- समुद्र संशोधन करण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद
- ५ वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष्य
- देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या – महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती
- सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज; ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना
- उज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १ कोटीने वाढवणार
- लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद
- लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणीची घोषणा
- देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार
- सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिंगवर काम सुरु
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद
- ३ वर्षात ५ लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणार