बीसीसीआय चे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तब्येत आता बरी असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
सौरभ गांगुली भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार देखील होते. डॉक्टरांनुसार, दादांना ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. टिपल डिजीज हा आजार नेमका आहे तरी काय आणि हा आजार किती घातक ठरू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – Mumbai Local- नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल..
सौरव गांगुली यांना २६ जानेवारी २०२१ च्या रात्री छातीत वेदना होत होत्या. रात्रभरात त्रास अधिक वाढल्याने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे अॅंजियोप्लास्टी करून त्यांच्या हृदयातील धमण्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी २ स्टेंट लावण्यात आले. मेडिकल सायन्सच्या विश्वातील एक प्रसिद्ध नाव आणि सुप्रसिद्ध हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. देवी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सौरव गांगुलींची अॅजिओप्लॅस्टी करण्यात आली.ते एक कार्डियाक सर्जन असून २०१२ मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कार देखील मिळाला होता.
२ जानेवारीला ट्रेडमिलवर धावत असताना दादांना का,र्डियाक अरेस्टचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना कोलकातातील वुडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ७ जानेवारीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.
ट्रिपल वेसेल डिजीज म्हणजे काय ?
ट्रिपल वेसेज डिसीज हा आजार कोरोनरी आर्टरी डिजीजचं एक घातक रूप आहे. हृदयात ३ मोठ्या धमण्या रक्त पोचवण्याच काम करतात आणि या तिन्ही धमण्या जेव्हा ब्लॉक होतात तेव्हा याला ट्रिपल वेसेल डिजीज अशा नावाने ओळखलं जातं. यामुळे छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो.