आज दुपारी मालाड येथे घडली र्दुघटना. हायवेजवळील पायरया कोसळून पडल्या.
मालाड : पुष्पापार्क, मालाड येथे पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडल्या गेलेल्या पायरया आजचा मुसळधार पावसामुळे कोसळून पडलेल्या आहेत. सकाळ पासून सतत पडत असणार्या मुसळधार पावसामुळे या पायरया कोलमंडून पडल्या आहेत. दुपारच्या सुमारे १२.३० ते १ च्या दरम्यान ही र्दुघटना घडलेली आहे.
मालाड पूर्वेकडील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडल्या गेलेल्या पायरया कोसळून पडल्या. या पूलालगत अनेक खाद्यपदार्थाचे स्टाॅल देखील लागत असत. शिवाय या ठिकाणाहून ये-जा करणार्यांची संख्या देखील जास्त असायची. परंतु या भागात कोरोणाचे जास्त रूग्ण सापडल्यामुळे येथे कडक टाळेबंदी असल्यामुळे लोकांची ये-जा कमी होती. त्यामुळे कोणालाही दुखापत झालेली नाही आहे. परंतु आजूबाजूला वाहनांची पार्किंग केली जात होती त्यातील काही वाहने आणि उभे असलेले स्टाॅल कोसळले आहेत.
हे देखील वाचा – अंधपणाला न खचता लहान मुलाचे संगोपन करताना ही संकट आली! वाचा…
बांधकाम फार जुने असल्या कारणाने पायरया कोसळल्याचे समोर येत आहे. किर्ती काॅम्प्युटर क्लासेस समोरील मार्गावर ही घटना घडलेली आहे. हायवे च्या अलिकडील म्हणजेच हायवेपासून आप्पापाडासाठी जाताना लागणार्या मार्गावर ही घटना घडलेली आहे.
हवामान खात्याने २ दिवस मुसळधार पावसाची कल्पना देऊन सावध राहण्याचा इशारा केला होता. शिवाय वादळाचे देखील चिन्ह दिसत असल्दियाचे हवामान खात्याने म्हटले होते. त्याप्रमाणे आज शनिवार रोजी सकाळपासूनच जोरदार पाऊसाने थैमान घातले आहे.