नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मागण्या करत आदोलंन केल्यावर त्यावर निर्सुणय घेणे फार लांबण्यात आले. मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर फार काळ स्थगिती देऊन आतापर्यंत लांबवण्यात आले. परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या सुनावणी ८ मार्च ते १८ मार्च दरम्यान होणार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांनी ८, ९, आणि १० मार्च रोजी आपलायुक्तीवाद करावा.
आणि १२, १५, १६ आणि १७ मार्च रोजी राज्य सरकारला युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला आहे. १८ मार्चला केंद्राच्या वतीने ॲटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत.
८ मार्चला अंतिम सुनावणीला सुरुवात करण्यात येईल आणि १८ तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण होईल अशी शक्यता बाळगण्यात येत आहे. राज्य सरकारची बाजू वकील मुकूल रोहतगी मांडणार आहेत. त्यांनी कोर्टासमोर सांगितले की, खंडाच्या दस्तावेजांच्या प्रिंट काढायला दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात यावी अशी विनंती केली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवावी, असा आग्रह धरला होता. मात्र, ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता.