उद्धव ठाकरे आणि सोनू सुद यांच्यात झाली भेट.
मुंबई 8 जून: सोनू सुद यांनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. काल रात्री १०.३० च्या सुमारास ही भेट झाली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेता सोनू सूद यांच्यावर टीका केली होती. ‘भाजप हा सोनू सुदचा बोलविता धनी आहे ‘ अस राऊतांनी म्हटल होत.
त्यामुळे सोनू सुदने थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर आले होते.
हेदेखील वाचा :
दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही त्याठिकाणी उपस्थित होते. सोनू सूद यांनी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी खूप मदतकार्य केले होते. लक्झरी बसेस उपलब्ध केल्या होत्या. या मदतीमुळेच संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं.
काही दिवसांपूर्वीच सोनू सुद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती.
मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत सोनू सूदने त्यांना तो करत असलेल्या मदतकामे याबाबत सविस्तर चर्चा झाली.