नवी दिल्ली, ६ जून: जगभरात आजकाल प्रत्येकाच्या मनात एकच कुचबुळ चालली आहे ती म्हणजे, कोरोनावर लस येईल तरी कधी ?
शेवटी सर्वासाठी राहत देणारी सुखःद अशी बातमी आली. लसीच्या करत असलेल्या चाचण्यांमध्ये भारतात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूंची लस तयार करुन त्याचा पुरवठा करण्याची तयारी करत आहे.
‘ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी ‘एस्ट्राजेनेका’ ने जाहीर केले आहे की, त्यांनी ‘ADZ1222’ या लसीचा पुरवठ्यासाठी भारतासोबत करारनामा केला आहे. तसेच एसआयआयबरोबर परवानाचा करार देखील करणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोनाच्या होतील तेवढ्या लस ‘एस्ट्राजेनेका’ कंपनीत पुरवण्याची जबाबदारी दिली आहे.
पुण्यात तयार होणारी कोरोना विषाणूची लस भारताबरोबरच जगभरातील अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांना पुरवली जाणार आहे.
‘एस्ट्राजेनेका’ आणि ‘एसआयआय’ दोघे एकत्र १०० कोटी लस तयार करण्याची तयारी करीत आहे. यापैकी ४० कोटी लस या वर्षाच्या शेवटपर्यंत पुरवण्याचे लक्ष्य आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात लसीची चाचणी दुसर्या टप्प्यात पोहोचली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ कोरोनावर लस बनवण्यात सर्वात आघाडीवर आहे. लसीची फेज २ आणि फेज ३ चाचणी देखील ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आली आहे.